Reports
म. वि. प्र.समाजाचे,
गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर, नाशिक.
............................................................................................................................................
वार्षिक अहवाल
राष्ट्रीय सेवा योजना विभाग २०२३ -२४
शैक्षणिक वर्ष २०२४ – २५ मध्ये रासेयो विभागात प्रथम वर्ष १२५ व द्वितीय वर्ष १२५ असे एकूण २५० विद्यार्थ्यांचे एकक आहे. वर्षभर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून नियमित कार्यक्रम होत असतात. या विभागात सन २०२४-२५ मध्ये खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
- २१ जून २०२४ रोजी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला .या प्रसंगी योगगुरू कु ऋतुजा कुस्तुले यांनी योग प्रशिक्षणाचे विद्यार्थ्यांना व शिक्षकांना योग प्रशिक्षण दिले
- २२ जून २०२४ रोजी प्रा ललित कळसकर यांनी माय भारत पोर्टल प्रशिक्षण शिबिरात संदीप फाउंडेशन नाशिक येथे सहभाग नोंदविला
- २५ जून २०२४ रोजी रासेयो विभागाच्या वतीने संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्यास स्वच्छता व शिस्तीचे नियोजन करण्यासाठी सहभाग नोंदविला
- १६ जुलै२०२४ रोजी महाविद्यालयात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली. तसेच महाविद्यालयात भव्य वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले.
- २५ जुलै २०२४ रोजी उच्च्य शिक्षण मंत्री आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या नवीन शैक्षणिक धोरण या विषयवार शिक्षक विद्यार्थी व पालक यांच्या सोबत थेट प्रक्षेपनाद्वारे संवाद साधण्यात आला.
- 3 ऑगस्ट 2024 रोजी महाविद्यालयात अवयव दान दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयाची उपप्राचार्य प्राध्यापक आर व्हि पवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
- ७ ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयात रक्तदान व रक्ताचे विकार या विषयावर प्रा डॉ प्रकाश पांगम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
- ८ ऑगस्ट२०२४ रोजी सिडको महाविद्यालयात झालेल्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग नाशिक नियोजन सभेत प्राध्यापक ललित कळसकर यांनी सहभाग नोंदवला
- १३ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयात तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
- १४ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सिन्नर शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली.
- १५ ऑगस्ट २०२४ रोजी सेल्फी विथ तिरंगा अभियान राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राबविण्यात आले.
- १९ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाची शपथ घेण्यात आली
- २७ ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आली त्याचप्रमाणे 250 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन चाचणी घेण्यात आली .तसेच २६ रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले
- २४ ऑगस्ट २०२४ रोजी सिन्नर जवळील ढग्या डोंगरावर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले त्याचप्रमाणे डोंगरावर सीडबॉल ५०० सीडबॉल फेकण्यात आले याप्रसंगी वृक्षांना संरक्षक जाळ्या लावण्यात आल्या
- २८ ऑगस्ट २०२४ रोजी एच आय व्ही एड्स जनजागृती प्रशिक्षण जिल्हा सरकारी रुग्णालय येथे प्राध्यापक ललित कळस्कर यांनी सहभाग नोंदवला
- ३० ऑगस्ट २०२४ रोजी महाविद्यालयात वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी 31 वृक्षांची लागवड करण्यात आली
- ३१ ऑगस्ट २०२४ रोजी रस्ते वाहतूक नियमाने अँटी रॅगिंग कायदा या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात. आले याप्रसंगी श्रीमती के एस खंडारे सह दिवाणी न्यायाधीश सिन्नर व श्री आर एस कानडे दिवाणी न्यायाधीश सिन्नर यांचे मार्गदर्शन लाभले
- १० सप्टेंबर २०२४ रोजी सिन्नर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शून्य सर्पदंश व मानवविविध सहवास या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले याप्रसंगी सुशांत रणशूर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
- २३ सप्टेंबर २०२४ रोजी लाचलुचपत विरोधी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला व विद्यार्थ्यांना लाच लुचपत विरोधात शपथ देण्यात आली
- दि. २४ सप्टेबर २०२५ रोजी झालेल्या विद्यापीठ स्तरीय काव्यवाचन स्पर्धेत कु वैष्णवी झगडे ही विद्यार्थिनी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली
- २४ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र कबड्डी संघाच्या माजी कॅप्टन स्नेहल साळुंखे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे युवा पुरस्कार विजेते श्री मनोहर जगताप यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ दिली
- २७ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालयातील उद्यानातील स्वच्छता करण्यात आली
- २८ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालयातील स्टेज समोरील मैदानाची स्वच्छता करण्यात आली
- २८ सप्टेंबर २०२४ रोजी महाविद्यालयाची संरक्षण भिंत व शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात स्वच्छता करण्यात आली
- १ ऑक्टोबर २०२४ रोजी सिन्नर येथील हुतात्मा स्मारक बस स्थानक आणि ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली
- ७ ऑक्टोबर २०२४ रोजी राष्ट्रीय युनिटने निफाड येथील घनकचरा व्यवस्थापन कार्यप्रणाली शिकवून घेण्यासाठी निफाड येथील कचरा व्यवस्थापन युनिटला भेट दिली
- ६ नोव्हेंबर २०२४ रोजी आव्हान शिबिराचे नियोजन महाविद्यालयात करण्यात आले होते
- दि.७ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील राज्यस्तरीय आव्हान शिबिरात महाविद्यालयातील कु अर्पित तिवारी व कु साक्षी टाकळकर या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला
- २६ नोव्हेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला
- १ डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात एड्स दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉ. विलास बोडके डॉ. अमृता कटारे व प्रयोगशाळा वैज्ञानिक राजकुमार आणेराव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच एड्स दिनाची शपथ देण्यात आली.
- १० डिसेंबर २०२४ रोजी महाविद्यालयात मानवी हक्क दिन साजरा करण्यात आला
- १८ डिसेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयामध्ये अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी डॉ. सी ई गुरुळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले
- २३ जानेवारी २०२४ रोजी प्रा. ललित कळसकर यांनी रा से यो विभाग आयोजितपुणे येथे झालेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चिंतन आणि भारताचा शाश्वत विकास या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदविला.
- २५ जानेवारी २०२४ रोजी महाविद्यालयात मतदार दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी प्राध्यापक आर डी आगवणे यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी आणि मतदानाचे महत्त्व सांगितले
- दि. १५ ते १७ जानेवारी २०२४ या कालवधीत रासेयो विभाग आयोजित ३ दिवसीय राज्यस्तरीय ताणताणाव व्यवस्थापन कार्यशाळा महाविद्यालयात संपन्न झाली
- २ ते ८ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रम संस्कार शिबीर धारणगाव. ता सिन्नर येथे संपन्न झाले
- १२ फेब्रुवारी रोजी २०२५ रासेयो विभाग आयोजित १ दिवसीय किल्ले संवर्धन कार्यशाळा विश्रामगड पट्टा किल्ला संपन्न झाली . येथे विद्यार्थ्यांनी ५ गोनी भरून प्लास्टिक जमा केले व गडावरील पायऱ्या वरील खडे दगड दूर करून स्वच्छता करण्यात आली
- कार्यक्रम अधिकारी शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ मध्ये श्री ललित कळसकर यांची रासेयो नाशिक जिल्हा विभाग समन्वयक म्हणून निवड झाली.
- १६ ते २२ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबीरात कु सार्थक इंगळे या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग नोंदवला
- २६ फेब्रुवारी २०२५ रोजी रासेयो स्वयंसेवकांनी सिन्नर येथील प्रसिध्द ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिरात स्वच्छता व यात्रा नियोजन करण्यास सहकार्य केले.
म. वि. प्र.समाजाचे,
गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर, नाशिक.
............................................................................................................................................
वार्षिक अहवाल
राष्ट्रीय सेवा योजना विभाग २०२२ -२३
-
- शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये रासेयो विभागात प्रथम वर्ष 125 व द्वितीय वर्ष 125 असे एकूण 250 विद्यार्थ्यांचे एकक आहे.
- दि.21/06/2023 रोजी रासेयो विभागाच्या वतीने जागतिक योग दिन साजरा करण्यात आला याप्रसंगी 56 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
- दि.01/07/2023 ते 15/07/2023 दरम्यान महाविद्यालयात वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान सुमारे महाविद्यालय परिसर व विद्यार्थ्यांनी त्यांच्या गावात 290 वृक्षलागवड करण्यात आली.
- दि.26/07/2023 रोजी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान व अपघात प्रतिबंध कार्यक्रम राबविण्यात आला.याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील व मोटार वाहन निरीक्षक मंगेश दिघे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.
- दि.03/08/2023 रोजी महाविद्यालयात रासेयो विभागाच्या वतीने भारतीय अवयव दान दिन साजरा करण्यात आला व विद्यार्थ्याना अवयव दानाची शपथ देण्यात आली.
- दि.01/08/2023 रोजी महाविद्यालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
- दि.12/08/2023 रोजी अवयव दान मोहीमच्या ऑनलाइन उपक्रमात विद्यार्थी सहभागी झाले.
- दि 15/08/2023 रोजी महाविद्यालयात दुसरे महा-स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
- दि. 29/08/2023 रोजी महाविद्यालयात फिट इंडिया रन हा कार्यक्रम राबविण्यात आला याप्रसंगी महाविद्यालयातील 210 स्वयंसेवक सहभागी झाले.
- दि.30/08/2023 रोजी सर्व रासेयो स्वयंसेवकांनी वृक्षांना राखी बांधून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेऊन रक्षाबंधन साजरे केले.
- दि.05/09/2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिर भरविण्यात आले , यामधे 16 रक्त बॅग चे संकलन करण्यात आले.
- दि.24/09/2023 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी, शिक्षणाधिकारी प्रा.ढोके सर, रासेयो जिल्हा समन्वयक प्रा. रवींद्र अहिरे व संचालक माननीय कृष्णजी भगत यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले.
- दि.02/10/2023 व दि.28/10/2023 या दोन दिवशी महाविद्यालयात, हुतात्मा स्मारक व इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आले
- दि.31 ऑक्टोबर पर्यंत महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश अभियान राबविण्यात आले ,याप्रसंगी सुमारे 1697 सेल्फी मातीसोबत घेऊन ते गिनीच बुक मधे नोंद करण्यासाठी विद्यापीठात पाठविण्यात आले.
- दि.31/10/2023 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला , याप्रसंगी , व्याख्यान, एकात्मतेची शपथ व एकता दौड ई. उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- दि.26/11/2023 रोजी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे वाचन, व्याख्यान व प्रश्नमंजुषा इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
- दि.24/11/2023 रोजी राष्ट्रीय सेवा योजना व महाविद्यालय यांच्या वतीने गरीब वस्तीमध्ये कपडे व फराळ वाटप करण्यात आले.
- दि.01/12/2023 रोजी महाविद्यालयात एड्स जनजागृती मोहीम राबविण्यात आली याप्रसंगी डॉ. संदीप शिंदे यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले त्याचप्रमाणे सिन्नर शहरातून मोठी एड्स जनजागृती रॅली काढण्यात आली.
- दि.24/12/2023 रोजी महाविद्यालयात आव्हान परिसंवाद 2023 चे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आव्हान शिबिरास जाणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा समन्वयक डॉक्टर रवींद्र अहिरे व संघनायक प्राध्यापक वर्षा शिरोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
- दि.12/01/2024 महाविद्यालयात युवा दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी श्रीकंठानंद स्वामी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले याच दिवशी दुपारी राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक नाशिक येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या युवा दिनानिमित्त होणाऱ्या मार्गदर्शनास उपस्थित राहिले
- दि.18 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी श्रमसंस्कार शिबिर धारणगाव येथे आयोजित करण्यात आले होते याप्रसंगी 7 दिवस वैचारिक प्रबोधन, ग्राम स्वच्छता , नदी स्वच्छता ऐतिहासिक स्थळ स्वच्छता व या गावात 120 वृक्ष लागवड करण्यात आली.
- दि.25/01/2024 रोजी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला व स्वयंसेवकांना मतदार दिनाची शपथ देण्यात आली.
- दि.30/01/2024 रोजी महाविद्यालयात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 - स्कूल कनेक्ट संपर्क अभियान HSC शेवटच्या वर्षातील मुलासाठी राबविण्यात आले.मार्गदर्शक म्हणून, प्रा.पी व्हि रसाळ , डॉ.चांगदेव गुरुळे, डॉ. जी आर पाटील व प्रा. डी एस सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले
- दि. 12/03/2024 रोजी सिन्नर शहरात मतदान जनजागृती rally काढण्यात आली यात NSS चे 29 स्वयंसेवक सहभागी झाले
- दि. 22/03/2024 रोजी bhatvadi या गावात जल साक्षरता या विषयवार डॉ. पी व्ही रसाळ यांनी विद्यार्थी व गावकर्यांना मार्गदर्शन केले व गावात जल साक्षरता rally काढण्यात आली. यामध्ये 42 स्वयंसेवक सहभागी झाले.
- दि. 08/04/2024 रोजी सिन्नर शहरात दुसरी मतदान जनजागृती rally काढण्यात आली यात NSS चे 59 स्वयंसेवक सहभागी झाले
- दि. 21/02/2024 रोजी महाविद्यालयात अंधश्रद्धा निर्मुलन कार्यक्रम घेण्यात आला. या प्रसंगी डॉ. ठकसेन गोराणे यांनी विविध वैज्ञानिक प्रयोगाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
म. वि. प्र.समाजाचे,
गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, सिन्नर, नाशिक.
............................................................................................................................................
वार्षिक अहवाल
राष्ट्रीय सेवा योजना विभाग २०२१ -२२
महाविद्यालयामध्ये २५० स्वयंसेवक असलेला राष्ट्रीय सेवा योजना विभाग कार्यरत आहे. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने दरवर्षी स्वयंसेवकांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या विभागात सन २०२१-२२ मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये,
- ०१ जुलै ते ०७ जुलै २०२१ या आठवड्यामध्ये वृक्षारोपण सप्ताह साजरा करण्यात आला. यामध्ये महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
- दिनांक ०१ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२१ हा कालावधी स्वच्छता पंधरवडा म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी स्वयंसेवकांना स्वच्छता शपथ देण्यात आली.
- दिनांक १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी. व्ही.रसाळ आणि मान्यवरांच्या शुभहस्ते महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
- दिनांक २० सप्टेंबर २०२१ रोजी थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त डुबेरे ता.सिन्नर येथील बर्वे वाड्यास भेट देण्यात आली यावेळी प्रा. सी. ज. बर्वे यांनी थोरले बाजीराव पेशवे यांच्याबद्दल माहिती दिली.
- २३ सप्टेंबर२०२१ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे उद्घाटन आणि राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यात आला. यावेळी पिंपळगाव बसवंत महाविद्यालयातील प्रा. ज्ञानोबा ढगे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले.
- २९ सप्टेंबर २०२१ रोजी स्वतंत्र्यांचा अमृत महोत्सव अंतर्गत पाटोदा गावाचे आदर्श सरपंच मा. श्री.भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनी उपस्थितांना आदर्श गाव कसा निर्माण होतो याची योजना सांगतली.
- दिनांक ८ ते १४ ऑक्टोबर २०२१ दरम्यान मानसिक आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सप्ताहामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. डी. एम. जाधव सर यांनी वनस्पती आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. प्रा. श्रीमती प्रणाली आहेर यांनी डाएट या विषयावर व्याख्यान दिले. डॉ. एन. व्ही. देशमुख यांनी वाचन आणि मानसिक आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. लासलगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश नाईक याच्या व्याख्यानातून मानसिक आरोग्य सप्ताहाची सांगता झाली त्यांनी पसायदान आणि अध्यात्मिक आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. तसेच मानसिक आरोग्य सप्ताहा दरम्यान स्वयंसेवकांनी स्वच्छता मोहीम राबवून आरोग्याचे महत्त्व पटवून दिले.
- दिनांक १५ ऑक्टोबर २०२१ रोजी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त राष्टीय सेवा योजना आणि ग्रंथालय विभागाच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. एस. बी. अहिरे याचे व्याख्यान आयोजित केले होते. यामध्ये स्वयंसेवकांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
- २३ ऑक्टोबर २०२१ रोजी महाविद्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली तसेच झाडांना आळे करण्यात आले या कार्यक्रमात स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला.
- २६ ऑक्टोबर २०२१ रोजी कोविड-१९ लसीकरण मोहिमेचे आयोजन सिन्नर ग्रामीण रुग्णालय यांच्यामार्फत महाविद्यालयात करण्यात आले होते. तसेच कायदेविषयक जनजागृती शिबिराचे देखील आयोजन या दिवशी करण्यात आले होते. यावेळी सिन्नर न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश श्री. डी. एस. जाधव, एडवोकेट अण्णासाहेब सोनवणे, म.वि.प्र. सिन्नर तालुका संचालक मा. हेमंत नाना वाजे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ आणि कार्यक्रमाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.
- दिनांक ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सरदार वल्लभभाई पटेल यांना आदरांजली वाहून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ स्वयंसेवकांना देण्यात आली.
- दिनांक ११ नोव्हेंबर २०२१ रोजी या पारधीची मेट ता. त्र्यंबकेश्वर गावात दिवाळी उत्सवानिमित्त कपडे आणि फराळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. माधव खालकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तसेच श्रीमती मंगल सोनावणे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. बी.कर्डक आणि पारधीची मेट गावाचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपस्थित होते.
- दिनांक २४ नोव्हेंबर २०२१ रोजी आरोग्यविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये मानवी आरोग्यावर परिणाम करणारे विविध घटक आणि त्यावरील उपाय यावर श्री निशांत आभाळे यांनी विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपाय या विषयावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.
- दिनांक २६ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय सेवा विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी adv. अण्णासाहेब सोनावणे आणि प्रा.आर. डी.आगवणे यांचे भारतीय संविधान, संविधान निर्मिती, नागरिकाचे मुलभूत अधिकार आणि कर्तव्य या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. याप्रसंगी संविधान उद्देशिकेचे सामुदाईक वाचन करण्यात आले. यावेळी बहुसंख्य स्वयंसेवक आणि प्राध्यापक उपस्थित होते.
- दिनांक ०३ डिसेंबर २०२१ रोजी महाविद्यालयात जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. व्ही. रसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
- दिनांक ०७ डिसेंबर २०२१ रोजी जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोडी ग्रामीण रुग्णालयातील समुपदेशक श्री. विलास बोडके, श्री. राजकुमार आणेराव, राहुल शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
- दिनांक १० डिसेंबर २०२१ रोजी महाविद्यालय विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे नियोजन करण्यासाठी नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. बी. कर्डक शिबिरातील शिस्त आणि शिबिरातील उपक्रम याबद्दल यांनी मार्गदर्शन केले.
- दिनांक १६ ते २२ डिसेंबर २०२१ या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे हिवाळी श्रमसंस्कार शिबिर डुबेरे ता. सिन्नर या दत्तक गावी घेण्यात आले. या शिबिरामध्ये स्वच्छता मोहीम ,मातीच्या बांधांना दगडी पिसिंग करणे, मातीच्या बांधाचे खोलीकरण करणे, वृक्षारोपण व जलसंधारणाची कामे करण्यात आली.तसेच विविध तज्ज्ञाची व्याख्याने यावेळी संपन्न झाली.
- १२ जानेवारी २०२२ रोजी युवा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी प्रा. हेमंत टिळे याच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
- दि. २४ जानेवारी २०२२ बालीकादिना निमित्त प्रा. श्रीमती जे. जे. भांगरे यांच्या दुरदृश्य प्रणालीद्वारे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बहुसंख्य विद्यार्थिनी स्वम्सेवक उपस्थित होत्या.
- दिनांक २५ जानेवारी २०२२ रोजी महाविद्यालयात मतदार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. ए आगवणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
- २६ जानेवार २०२२ रोजी महाविद्यालयात प्रजासत्ताक दिनाचे आयोजन करण्यात आले होते.स्वयंसेवकांनी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सक्रीय सहभाग नोंदवला.
- दिनांक १० फेब्रुवारी २०२२ रोजी विद्यापीठ वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा ताई पवारया प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
- दिनांक २६ फेब्रुवारी २०२२ रोजी महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रा. रामेश्वर उगले मराठी विभाग यांचे व्याख्यान आयोजित केले होते.त्यांनी मरठी भाषा संवर्धन या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
- दि. ८ मार्च २०२२ रोजी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा.श्री. सुरेंद्र (नाना) गुजराथी हे उपस्थित होते. त्यांनी स्त्रियांचे हक्क आणि अधिकार या विषयी मार्गदर्शन केले.तसेच ‘तिच्याविना’ या एकपात्री प्रयोगाचे उस्फुर्त सदरीकरण केले.
- याच बरोबर विविध महाविद्यालयांनी आयोजित केलेल्या शिबिरांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला. यामध्ये कु. शिंदे पंकज बाळू , कु. शिंदे आकाश अजित, कु. सानप स्वप्नील मोहन, कु. रासकर अभिषेक नंदू यांनी दि.२६ फेब्रुवारी २०२२ रोजी चांदवड महाविद्यालय येथे झालेल्या एक दिवसीय लिंगभाव संवेदिकरण या कार्यशाळेत सक्रीय सहभाग घेतला.
- तसेच, दि. २७ फेब्रुवारी ते ०५ मार्च २०२२ रोजी डी.वाय.पाटील महाविद्यालय, पुणे, रतनगड येथे आयोजित निसर्ग संवर्धन आणि आयोजित गिर्यारोहण शिबिरात कु. शिंदे पंकज बाळू, कु. शिंदे आकाश अजित, कु. रासकर अभिषेक नंदू यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
- डी. वाय. पाटील महाविद्यालय आयोजित राज्यस्तरीय आदिवासी संस्कृती जतन या शिबिरामध्ये कुमारी डोंगरे निशा सुशील, कुमारी मोहिते कल्याणी विजय, कु. शिंदे पंकज बाळू, कु. शिंदे आकाश अजित, कु. रासकर अभिषेक नंदू, कु. सानप स्वप्नील मोहन या स्वयंसेवकांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
- दिनांक १६ मार्च ते २२ मार्च २०२२ या कालावधीत मामासाहेब मोहळ महाविद्यालय पौड रोड पुणे आयोजित युवक युवती उन्नायीकरण कार्यशाळेत कुमारी भालेराव सरला साहेबराव, कुमारी शिंदे विजया संपत, कुमारी वारुंगसे विद्या नवनाथ आणि घोलप ऋतुजा नारायण यांनी सक्रीय सहभाग नोंदवला.
- अशाप्रकारे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.व्ही. रसाळ यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व उपप्राचार्य, महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक वृंद ,शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक आणि महाविद्यालयातील विद्यार्थी या सर्वांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागास सहकार्य केले.या कार्यक्रमांसाठी कार्यक्रम अधिकारी म्हणून प्रा. एस. बी. कर्डक, प्रा. वाय. एल. भारस्कर, प्रा. श्रीमती जे.जे.भांगरे, प्रा. श्रीमती अर्चना पगार यांनी विशेष परिश्रम घेतले.